मुंबई, दि. २२ जून २०२५ – मराठी एकीकरण समितीचा राज्यस्तरीय मराठी शिलेदार मेळावा काल प्रभादेवी, मुंबई येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात राज्याच्या विविध भागांतील मराठी शिलेदार, पदाधिकारी आणि मराठी प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या मेळाव्यात राज्यातील सुरू असलेल्या हिंदीकरणाच्या विरोधात तीव्र आवाज उठवण्यात आला. “मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती अस्मिता, अर्थकारण आणि जनतेच्या हक्कांचा मुद्दा आहे. तिचे रक्षण करणे हे प्रत्येक मराठी व्यक्तीचे कर्तव्य आहे,” असा ठाम संदेश मेळाव्यातून देण्यात आला.

सामान्य माणसाची लोकचळवळ उभी राहिली पाहिजे, राज्यशासनाच्या अन्यायकारक धोरणांना प्रशासन, शिक्षण, साहित्य, कला व सामाजिक क्षेत्रातून संघटित निषेध झाला पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मराठीचा मुद्दा कोणत्याही पक्षाचा नव्हे, तर जनतेच्या जगण्याचा आणि अस्तित्वाचा मुद्दा आहे, असे समितीचे मत यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक श्री. डी. एस. कुलकर्णी आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक पवार उपस्थित होते. त्यांनीही आपल्या भाषणातून मराठी अस्मितेसाठी सामूहिक लढ्याची गरज अधोरेखित केली.

त्याचबरोबर कार्याध्यक्ष अँड श्री प्रदीप सामंत, अध्यक्ष श्री गोवर्धन देशमुख यांनी आपले प्रभावी व परखड मत व्यक्त केले.

मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) या बिगर राजकीय लोकचळवळीत मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र धर्मासाठी कार्य करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मराठी शिलेदारांनी आपली माहिती इथे भरावी. आमचे सभासद व्हा.

आमचे कार्य, उपक्रम जाणून घेण्यासाठी आमच्या समाज माध्यमांद्वारे आमच्याशी जोडले जा.

फेसबुक – https://www.facebook.com/marathiEkikaran
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/marathiekikaran/
यूट्यूब : https://www.youtube.com/@ekikaranmarathi
एक्स (ट्विटर) : https://x.com/ekikaranmarathi

खूप छान काम करत आहे समिती. कुठे तरी आपल्या भाषेसाठी कोणी तरी उभे राहिले आहे याचे अभिमान वाटते. जय मराठी जय महाराष्ट्र 🚩🚩
प्रभादेवी येथील आपल्या मेळाव्याला सर्व मराठी शिलेदारांनी जी काही जास्त उपस्थिती लावून आपला मेळावा उत्साहात साजरा केला त्या बद्दल सर्व मराठी शिलेदारांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन
आपण सर्वांनी या पुढे सुद्धा अशीच सोबत कायम राहावी. मेळाव्यात या पुढे जिथे कुठे ही असेल तेथे आपल्या अर्धांगिनी व आई बहिण व इतर महिला वर्ग या सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची संधी द्यावी. जेणेकरुन आपल्या मराठी समितीचे जे काही विचार आहेत सर्व दूर जातील.
मराठी एकीकरण समिती च एकंदरीत कार्य हे कौतुकास्पद आहे.
मराठी साठी खूपच चांगले काम करत आहे समिती.
जय शिवराय जय महाराष्ट्र जय मराठी
जय शिवराय!!
मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी लढणाऱ्या मराठी एकीकरण समिती बरोबर मराठी माणसाने खांद्याला खांदा लावून उभे राहिले पाहिजे. सध्या चाललेल्या परप्रांतीयांचे आक्रमण आणि त्यांना पोसणारे मराठी भैये यांना रोखण्यासाठी तसेच आपल्या येणाऱ्या पिढ्यांना मराठी स्वातंत्र्य देण्यासाठी सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. तर आणि तरच मराठी माणूस जगू शकेल नाहीतर हे परप्रांतीय ” एक था मराठी माणूस ” असे अभिमानाने सांगत राहतील.