विपत्र मोहीम : दाट लोकवस्तीतील कबुतरखाने कायमस्वरूपी बंद करण्याबाबत कायदेशीर हरकत व सूचना

मुंबईसारख्या महानगरात आपण आधीच प्रदूषण, गर्दी, वाहतूक या अनेक समस्यांना तोंड देत आहोत. त्यातच दाट लोकवस्तीतील कबुतरखाने हे नागरिकांच्या आरोग्यासाठी एक गंभीर संकट बनले आहे.

वैज्ञानिक अभ्यास व वैद्यकीय अहवालानुसार कबुतरांच्या विष्ठेमुळे

  • दमा, अ‍ॅलर्जी,

  • फुफ्फुस विकार (Pigeon Lung Disease),

  • लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होते.

याशिवाय, कबुतर हा भारतातला स्थानिक पक्षी नसून एक invasive species आहे. यामुळे स्थानिक पक्ष्यांचे (विशेषतः चिमण्या) अस्तित्व धोक्यात आले आहे आणि पर्यावरणीय समतोल बिघडत आहे.

माननीय न्यायालयाने यावर स्पष्ट आदेश दिले असतानाही, काही ठिकाणी पुन्हा “कंट्रोल फीडिंग” सारख्या उपक्रमांना परवानगी दिली जात आहे. हा न्यायालयीन आदेशाचा अवमान असून, आपल्या आरोग्य आणि पर्यावरणाशी खेळ करणारा निर्णय आहे.


आपण काय करू शकतो?

👉 आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची जबाबदारी आहे.
👉 जर आपण सर्वांनी मिळून पालिकेला याबाबत ईमेल पाठवले, तर निश्चितच प्रशासनाला हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा लागेल.


✉️ तुमची कृती महत्वाची!

कृपया खालील विपत्र (ईमेल) पाठवा बटणावर क्लिक करून आपला ईमेल पाठवा.
हा ईमेल आधीच तयार आहे — फक्त “Send” वर क्लिक करा आणि तुमचा आवाज समाजापर्यंत पोहोचवा.

अनेकवचन: 62 thoughts on “विपत्र मोहीम : दाट लोकवस्तीतील कबुतरखाने कायमस्वरूपी बंद करण्याबाबत कायदेशीर हरकत व सूचना”

  1. कबूतर खाना हा कोणत्याही परिस्थितीत बंद झालाच पाहिजे कबूतर खाण्याचे दुष्परिणाम अनेक आहेत मानवी आरोग्याला त्यापासून धोका निर्माण होत आहे.

    1. असाच एक कबुतर खाना कल्याण साई चौक, स्वामी समर्थ मंदिराच्या परिसरात बनला आहे.
      सिंधी, गुजराती रोज दाणे टाकतात.
      जवळच खडकपाडा पोलीस चौकी पण आहे. पण काही फायदा नाही.
      जोवर complaint जात नाही तोवर काही करायचे नाही.

    1. मुंबई मधील कबुतरखाने कायमस्वरूपी बंद केले पाहिजेत.नागरीकांच्या आरोग्यासाठी काळजी घ्यावी.

      1. फक्त मुंबई मधीलच नाही तर, मानवी वस्तीमध्ये असणारे सर्व ठिकाणाचे कबुतरखाने बंद व्हायला पाहिजेत.

  2. दाट लोकवस्तीतील कबुतरखाने हे नागरिकांच्या आरोग्यासाठी एक गंभीर संकट बनले आहे. कबुतरखाना कायमस्वरूप बंद करण्यासाठी.

  3. राजीव महेंद्र म्हात्रे

    चोच जर भगवंताने दिली आहे तर, चाराची (अन्न) सोय सुद्धा त्यानेच उपलब्ध करून ठेवलीच असणार.

    आपण प्राणी पक्षांना सवय लावली आहे कृत्रिम अन्न द्यायची.

    एका विशिष्ट समाजाने पुण्याई साठी दिखावा केला आहे, प्रत्यक्षात दिवसभर किती पापे करत असतील, देव जाणे.

    1. विषय: दाट लोकवस्तीतील कबुतरखाने बंद करण्याबाबत हरकत व सूचना

      प्रति,
      कार्यकारी आरोग्य अधिकारी,
      बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.

      मा. महोदय,

      दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्डाने कबुतरखान्यात कबुतरांना खाऊ घालण्याची परवानगी मागितलेली आहे. या प्रस्तावास मी खालील कारणास्तव कडाडून विरोध नोंदवित आहे:

      १) सार्वजनिक आरोग्याचा धोका: कबुतरांची विष्ठा व गर्दीमुळे दमा, अ‍ॅलर्जी, फुफ्फुस विकार इत्यादी गंभीर आजार वाढतात. माननीय उच्च न्यायालयानेही आपल्या आदेशात याबाबत स्पष्टपणे इशारा दिलेला आहे.

      २) कंट्रोल फीडिंग अशक्य: ‘नियंत्रित खाऊ घालणे’ हे प्रत्यक्ष अमलात आणणे शक्य नाही. एकदा परवानगी मिळाल्यावर त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड होईल व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल.

      ३) पर्यावरणीय परिणाम: कबुतर हा invasive species आहे. त्याच्या अतिवाढीमुळे स्थानिक पक्ष्यांचे नुकसान होते व पर्यावरणाचा समतोल बिघडतो.

      ४) लोकवस्तीतील त्रास: कबुतरांच्या विष्ठेमुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, दुर्गंधी व मालमत्तेचे नुकसान होते. नागरिकांना दररोज या समस्यांना सामोरे जावे लागते.

      ५) पर्यायी उपाय: कबुतरांना खाद्य द्यायचे असल्यास ते दाट लोकवस्तीपासून दूर, नियंत्रित ठिकाणी करावे.

      वरील बाबींचा विचार करून, दाट लोकवस्तीतील कबुतरखाने कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा नागरिकांना आंदोलन व पुढील न्यायालयीन कारवाईचा मार्ग स्वीकारावा लागेल.

      आपला नम्र,
      सागर कोळी

    1. गुरुनाथ अनसुरकर

      उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईतील सर्व पदपथ फेरीवाला मुक्त करावे.कारण मुंबईतील रस्त्यावरील व गल्लोगलीतील पदपथ हे परप्रांतियांना भाड्याने देण्याचे कारस्थान राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू ठेवले आहे हे तत्काळ कायमस्वरूपी बंद करावेत सदर परवानाधारक फेरीवाले हे परवाना न लावताच पदपथावर बस्तान मांडत आहेत.याची आधारकार्ड तपासावीत.

    2. हो परप्रांतीय आणि अनधिकृत रस्ते आणि पदपथावर घाण करून मुंबई तुंबवत आहेत त्यांच्या वर ही कारवाई करावी.

    3. हेमंतकुमार कमलाकर कदम

      आधीच राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. येणारे लोंढे आधीच व्यस्त असलेल्या शहरातील नागरी सुविधा,वैद्यकीय क्षेत्र,वहातूक आगीवर कर न भरता बोजा टाकीत आहेत. सात बेटांचे क्षेत्रफळ असलेल्यांवर आणखीन किती दबाव टाकणार.
      कृपया लोंढे थांबवा गर्दी हटवा.
      महाराष्ट्र व भारताचा जयजयकार असो

    4. विजय नामदेव उके

      दाट वस्तीतील कबुतर खाणे मुंबई महानगर पालिके कडून कायमस्वरूपी बंद करण्यात यावे.

  4. कबुतर पाहिजेत कशाला ….आणि जर एवढं पुण्याच वाटत असेल तर पाप करतात कशाला…. पाप करायची मग ह्यांना ह्यांची पाप फेडायला कबुतरांना दाणे टाकायचे…..

  5. परप्रातांतुन येणार्‍या सर्व लोकांची क्रिमिनल रेकाॅर्ड चेक करणे ,गंभीर गुन्ह्यांतील लोकांना प्रवेश देऊ नये . इनर लाईन परमिट जारी करावा आणि सरकारी नौकरी किवा प्रायव्हट सेक्टर मधे मराठी लोकांनाच प्राधान्य द्यावे !

  6. विषय: दाट लोकवस्तीतील कबुतरखाने बंद करण्याबाबत हरकत व सूचना

    प्रति,
    कार्यकारी आरोग्य अधिकारी,
    बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.

    मा. महोदय,

    दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्डाने कबुतरखान्यात कबुतरांना खाऊ घालण्याची परवानगी मागितलेली आहे. या प्रस्तावास मी खालील कारणास्तव कडाडून विरोध नोंदवित आहे:

    १) सार्वजनिक आरोग्याचा धोका: कबुतरांची विष्ठा व गर्दीमुळे दमा, अ‍ॅलर्जी, फुफ्फुस विकार इत्यादी गंभीर आजार वाढतात. माननीय उच्च न्यायालयानेही आपल्या आदेशात याबाबत स्पष्टपणे इशारा दिलेला आहे.

    २) कंट्रोल फीडिंग अशक्य: ‘नियंत्रित खाऊ घालणे’ हे प्रत्यक्ष अमलात आणणे शक्य नाही. एकदा परवानगी मिळाल्यावर त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड होईल व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल.

    ३) पर्यावरणीय परिणाम: कबुतर हा invasive species आहे. त्याच्या अतिवाढीमुळे स्थानिक पक्ष्यांचे नुकसान होते व पर्यावरणाचा समतोल बिघडतो.

    ४) लोकवस्तीतील त्रास: कबुतरांच्या विष्ठेमुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, दुर्गंधी व मालमत्तेचे नुकसान होते. नागरिकांना दररोज या समस्यांना सामोरे जावे लागते.

    ५) पर्यायी उपाय: कबुतरांना खाद्य द्यायचे असल्यास ते दाट लोकवस्तीपासून दूर, नियंत्रित ठिकाणी करावे.

    वरील बाबींचा विचार करून, दाट लोकवस्तीतील कबुतरखाने कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा नागरिकांना आंदोलन व पुढील न्यायालयीन कारवाईचा मार्ग स्वीकारावा लागेल.

    आपला नम्र,
    [आपले पूर्ण नाव]
    [संपर्क तपशील]

  7. असेच पत्र सर्व महानगरपालिका साठी बनवा. मला नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको नवी मुंबई साठी बनवून मिळेल का?

  8. सुशील वळंजू

    नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी शहरातले कबुतरखाने न्यायालयाचा मान राखून बंद झालेच पाहिजेत.

  9. सागर करंगुटकर

    कबुतर नाही तर ते पारवे आहेत म्हणून त्या चा होणारा त्रास भरपूर आहे

    कबुतर खाने बंद करा

    जनतेचे आरोग्य फार महत्वा चे आहे

  10. सायली वळंजू

    नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी शहरातले कबुतरखाने न्यायालयाचा मान राखून बंद झालेच पाहिजेत.

  11. प्रकाश निर्मळ

    कबुतर हे पाळीव पक्षी नसून ते रानटी किंवा भटके जीव आहेत. ते आपले भोजन स्वतः मिळवू शकतात. मनुष्याने कुठल्याही भटक्या किंवा रानटी पशु पक्षास आयते अन्न दिल्यास विशिष्ट जीव आळशी आणि अस्वस्थ होतात. त्यातून पर्यावरणाचा समतोल बिघडतो. करीता कबुतरखाने बंद करण्यात यावेत.

  12. विष्णु आनंदा इंगळे

    जर माननीय न्यायालयाने आदेश दिले आहेत तर त्याने जरूर कारवाही झाली पाहिजे. एक कोणी संस्था किंव्हा व्यक्ती यांच्या नावावर जागा नसावी ती goverment चा ताबा असावा. मला वाटत की त्याजागी कबुतरांना कोण खायला घालते त्याचा फायदा कोणाला होतो.तिथे स्थानिक मराठा उद्योजक उभा करावा त्याजागी मराठा समाज यांना कोणताही धंदा करण्यासाठी योग्य मोबदला घेऊन त्या बेरोजगार तरुणांना जागा द्यावी अशी माझी अपना नम्र विनंती आहे.

  13. अनिकेत खाडये

    महाराष्ट्र आणि मराठी माणसांना गृहीत धरणं बास झालं. माजुरड्यांना त्यांची लायकी दाखवून द्यायलाच हवी.

  14. उपऱ्यांनो आमच्या महाराष्ट्र भुमीत येऊन जास्त माज कराल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी मराठी माणूस खंबीर आहे एक घाव दोन तुकडे

  15. सुर्यकांत साळवी

    लोक दाट वस्तीमधीलच नव्हे तर मुंबईमधील सर्वच कबुतरखाने बंद झालेच पाहिजेत. आणि सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे खाण्यास टाकणार्‍यांना जबर दंड लावला पाहिजे असा शासनाने कायदाच करावा. आणि त्याची काटेखोरपणे महापालिकांनी अंमलबजावणी करावी.

  16. महेश लक्ष्मण नर

    मा.उच्चनायलयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले पाहीजे शासनाची जबाबदारी आहे प्रत्येकाचा जिव वाचला पाहीजे योग्य मार्ग काढावा जातीचे राजकारण करू नये लोकांच्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे शेवटी प्रशासनाला त्रास आहे

  17. मायाजी वारीक

    कोणत्याही मानवाला त्रास होणार आहे तर ते बंध झालेच पाहिजे, यामध्ये धर्म जात म्हणजे मानव. कृपया मानव वाचवा

  18. सुर्यकांत साळवी

    दाट वस्तीमधीलच नाही तर मुंबईमधील
    सर्वच कबुतरखाणे बंद झालेच पाहिजेत. असा शासनाने कायदाच केला पाहिजे. आणि त्याची सर्व महापालिकांनी अंमलबजावणी केली पाहिजे. आणि कबुतरांना दाणे खायला
    घालणारांना जबर दंड महापालिकांनी लावावा.

  19. कोणत्याही भावनिक इच्छे च्या विरुद्ध जाऊन लोकांच्या तब्बेतीची काळजी घेतलीच गेली पाहिजे…. त्यांची सर्वस्वी जवाबदारी ही सरकारची असते

  20. पुर्णेंदु कृष्णकुमार घाणेकर

    आपण महाराष्ट्र राज्य स्थापने पासुन भाषेसाठी स्विकारलेली देवनागरी लिपी त्याग करुन मोडी लिपी पुन्हा स्विकारावी. त्यासाठी आंदोलन कराव .
    प्रसंगी कायदा करासाठी विधानसभेत ठराव पास करुन घ्यावा.
    एकदा मोडी स्विकारली का आपोआप ८० टक्के परप्रांतीयांवर निर्बंध येऊ लागतील. मराठी व्यवहार मोडीत , राज्य कारभार मोडीत होऊ लागल्यावर सरकारी योजनांचा लाभ उठवण्यावर परप्रांतीयावर आळा बसु लागेल.

    तसेच परप्रांतीयाना फुकट घर व शासकीय सेवा देण बंद कराव . मतदान अधिकार राज्यात प्राप्त होण्यासाठी निवासी कालावधी निर्धारीत करावा. ज्यामुळे केंद्रीय आस्थापनातील २/३ वर्षाच्या नियुक्ती वर येतात व पुन्हा जात नाहीत त्यावर आळा बसेल.
    मराठी माणुस केंद्रीय आस्थापना तुन बाहेर पाठवला जातो त्याच आर्थिक नुकसान होत पण महाराष्ट्रात आलेल्यांचा दुप्पट लाभ होतो ह्या पायबंद बसायला हवा . त्यामुळे राज्यात आलेले कायम स्थायिक होतात.
    बर्‍याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या बंद केल्यास ही समस्या सुधारण्यास मदत नक्कीच होईल.
    फक्त राजकरण व खिसागरम करणे आपली सात पिढ्यासाठी कमाई करण ह्याला आवर घातला तर.

  21. आदि पासून काहि निर्णय घ्यायचा होता, कबूतरा मूले दूसरा पक्षीयांची वस्ती कमी होते, कबूतरासाठी काही औषध बनवायची पायजे जेने कड़ूँन कबूतरांची वस्ती व प्रजनन कमी हो

  22. कबुतर पाळा तर घरी पळा
    अन्नाचा गैर वापर टाळा
    पिंजरे आम्ही देऊ कबुतर तुम्ही पाळा
    याने आपली एकी कायम राहिली जाईल

  23. कबुतर पाळा तर घरी पळा
    अन्नाचा गैर वापर टाळा
    पिंजरे आम्ही देऊ कबुतर तुम्ही पाळा
    याने आपली एकी कायम राहिली जाईल…!

  24. ज्यांना कोणाला कबुतराला चना, शेंगदाणे घालून पुण्य प्राप्त करून घ्यायचे असेल त्यांनी स्वतःच्या घरात कबुतरे पाळावेत. आमचा काही विरोध असणार नाही. परंतु त्या कबुतरा मुळे इतरांना त्रास होता कामा नये. जय हिंद जय महाराष्ट्र

  25. Nilesh Mangala Balasaheb Ghorpade

    कबुतर खाना बंद झाला पाहिजे . दुरवर शहराच्या बाहेर कुठे असेल तर चालेल . कुठे तरी कबुतर संख्या नियंत्रण तर पाहिजे नाही तर माणसे बाहेर आणि कबुतर आत अशी परिस्थिती

  26. अमित पांडुरंग रोगे

    सार्वजनिक ठिकाणी कबुतराला खाणे टाकणे सगळयांच्या आरोग्याच्या दृष्ठिकोनातुन धोकादायक आहे कबुतर हा मुक्त पक्षी आहे त्याला स्वतःच्या मनाप्रमाणे जगू देणे महत्वाचे आहे.

  27. विजया किसन भोगले

    आमच्या बाजूच्या मुलाने 20-25 कबुतर पाळली आहेत . आम्ही चाळीत राहतो . मोठा पिंजरा बनवून ठेवले आहेत . 1 वर्ष झालं . गेले 7-8 महिने मी त्याला सांगते आहे ते काढून tak तर ऐकत नाही आहे . उलट मलाच बडबड करतो या कि तुलाच कसा त्रास होतोय म्हणून . त्याला सांगितलं कि मला अस्थमा च त्रास चालू झाला हं त्यामुळे तरी ऐकत नाही आहे . कृपया मदत करा . धन्यवाद

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top