श्री. गोविंद पिंपळे यांच्या “स्वराज्य चहा नाश्ता” फिरते वाहन व्यवसायाचे संघटनेच्या हातून उद्घाटन

आज २ मे रोजी मिरा भाईंदर शहरात श्री गोविंद विठ्ठल पिंपळे यांच्या “स्वराज्य चहा नाश्ता” या फिरते वाहन या नवीन खाद्यगाडी व्यवसायाचे मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष श्री. गोवर्धन देशमुख यांनी उद्घाटन केले आणि व्यवसायाचे मालक श्री. पिंपळे कुटुंबीय यांना शुभेच्छा दिल्या. तसेच समितीचे अध्यक्ष श्री. गोवर्धन देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना “मराठी तरुणांनी आता व्यवसायात मोठ्या संख्येने उतरले पाहिजे. रस्त्यावर आणि मोक्याच्या ठिकाणी व्यवसाय करण्यास मनात कोणतीही कमीपणाची भावना न ठेवता अभिमानाने व्यवसाय करावा, मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) अशा तरुणांच्या पाठीशी नेहमी उभी आहे” असे मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे सहकारी शिलेदार प्रमोद पार्टे, विजय पाटील, अभिराज मोरे, संतोष कदम, भोसले, नितेश सावडेकर आणि इतर शिलेदार उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top