संसदेत निशिकांत दुबेला प्रश्न विचारणाऱ्या ३ मराठी महिला खासदारांचे अभिनंदन

प्रति,
सौ. वर्षा गायकवाड,
सौ. प्रतिमा धनोरकर,
डाॅ. शोभाताई बछाव,
मा. खासदार लोकसभा, नवी दिल्ली


सन्माननीय खासदार महोदय/महोदया,

सस्नेह नमस्कार,

संसदेत मा. निशिकांत दुबे यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर, आपल्या तिन्ही महिला खासदारांनी ज्या निर्धाराने, धाडसाने आणि एकतेने त्यांच्या विरोधात आवाज उठवला, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.

आपल्या एकजुटीने, “जय महाराष्ट्र” घोषणांनी आणि संयमित पण ठाम भूमिकेने मराठी अस्तित्वाचा सन्मान राखला आहे. मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र राज्य व आमच्या सामाजिक संस्थेतर्फे आम्ही आपल्याला या कृतीसाठी मन:पूर्वक आभार मानतो व हार्दिक अभिनंदन करतो.

आपल्या अशा ठाम भूमिकेमुळे संपूर्ण देशभर मराठी भाषेचे आत्मभान जागे झाले असून, महिलांचे नेतृत्व हे केवळ राजकारणापुरते नव्हे तर भाषिक एकात्मतेसाठी किती प्रभावी असते, याचा आदर्श आपण निर्माण केला आहे.

आपल्या पुढील महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी लढा व ठामपणे उभे राहाल, ही अपेक्षा.

आपणास मन:पूर्वक धन्यवाद.

हितचिंतक:
श्री. आनंद मारुती पाटील
उपाध्यक्ष,
मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्याचा व मराठी माणसाचा अवमान करणाऱ्या त्या अप्रगत राज्याच्या खासदार “निशिकांत दुबेला” सळो की पळो करून सोडलेल्या महाराष्ट्राच्या रणरागिणी तीन मराठी खासदारांचे अभिनंदन करताना व महाराष्ट्रात मराठीच ही भूमिका मांडणारे आपले मराठी एकीकरण समिती शिलेदार निनाद सावंत..
चित्रफीत पहा : https://www.facebook.com/share/v/16iuEySfLM/

महाराष्ट्र राज्याचा व मराठी माणसाचा अवमान करणाऱ्या त्या अप्रगत राज्याच्या खासदार “निशिकांत दुबेला” सळो की पळो करून सोडलेल्या महाराष्ट्राच्या रणरागिणी तीन मराठी खासदारांचे अभिनंदन करताना व महाराष्ट्रात मराठीच ही भूमिका मांडणारे आपले मराठी एकीकरण समिती शिलेदार योगेश प्रभाकर मोहन.

चित्रफीत पहा : https://www.facebook.com/share/v/16piYQZWQj/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top