भाईंदर (पश्चिम), 3 ऑगस्ट 2025 —
राई गावातील राममंदिर परिसर आज संध्याकाळी मराठी एकीकरण समितीच्या हाकेला प्रतिसाद देणाऱ्या शेकडो भूमिपुत्रांच्या उपस्थितीने दुमदुमला. “आपली माती, आपली ओळख, आपली जबाबदारी!” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या समाज जनजागृती व मराठी एकजूट सभेत मराठी अस्मिता, भाषा, शाळा आणि संस्कृतीचे रक्षण, स्थानिकांचा रोजगार, जमिनींचे संरक्षण आणि परप्रांतिय वर्चस्वाविरुद्ध एकजूट या विषयांवर चिंतनमंथन झाले. आयोजकांनी सांगितले की, हा फक्त पोटा-पाण्याचा प्रश्न नसून अस्तित्व, धर्म, भाषा, राज्याचे हक्क आणि पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
सभेत बोलताना नेत्यांनी मराठी शाळांचे इंग्रजीत रूपांतर, शिक्षणात हिंदी लादणे, तसेच मुख्यमंत्र्यांकडून परप्रांतियांना मराठी न बोलण्याचे प्रोत्साहन यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आपण झोपूं राहिलो, तर आपल्या पुढच्या पिढीला आपण काय उत्तर देणार आहोत?” असा सवाल करत उपस्थितांना संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले.
मीरा-भाईंदरमध्ये नुकत्याच झालेल्या “मराठी मेळावा”नंतर ही सभा मराठी जनतेच्या ताकदीचे आणखी एक उदाहरण ठरली. ठाणे, पालघर, रायगडसह संपूर्ण राज्यभर मराठी हक्कांसाठी आंदोलनाची ठिणगी पोहोचवण्याचा निर्धार यातून व्यक्त झाला.
यावेळी उपस्थित मान्यवर :
अशोक पाटील : भूमिपूत्र समन्वयक समिती अध्यक्ष
प्रशांत म्हात्रे : आगरी एकता मंच
ॲडव्होकेट सुशांत पाटील : आगरी एकता समाज आणि पंचमहाभूत
सर्वेश तरे : पंचमहाभूत
भगवान पाटील : राई गाव पंचमंडळ अध्यक्ष
राजेश पाटील : मोरधा गाव पंचमंडळ अध्यक्ष
दयानंद पाटील : बांधकाम समिती अध्यक्ष, अभिनव विद्या मंदिर
गोवर्धन देशमुख : अध्यक्ष – मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)
प्रमोद पार्टे : उपाध्यक्ष – मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)
कृष्णा जाधव : सरचिटणीस – मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)
सचिन घरत : शहर संघटक, मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)
हेमेंद्र भोईर : मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)
आगरी एकता मंच, प्रशांत म्हात्रे, हेमेंद्र भोईर व गावकरी यांच्या पुढाकाराने झालेल्या या सभेत स्थानिक तरुणांचे रोजगार, व्यवसाय सक्षमीकरण, जमिनींचे प्रश्न आणि मराठी ओळख जपण्यासाठी व्यापक लोकचळवळ उभारण्याचा ठराव करण्यात आला.
सभेचा शेवट जयघोषाने झाला — “जय मराठी! जय महाराष्ट्र!”
सदर कार्यक्रमाची छायाचित्रे :





















सदर कार्यक्रमाच्या चित्रफिती :
