मिरा भाईंदर – दहिसर मेट्रो ९ मार्गिकेवरील “मेडतीया नगर” स्थानकाच्या नावाला मराठी एकीकरण समितीचा विरोध, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची मागणी

मिरा भाईंदर – दहिसर मेट्रो ९ मार्गिकेवरील “मेडतीया नगर” स्थानकाच्या नावाला मराठी एकीकरण समितीचा विरोध, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची मागणी
मिरा भाईंदर – दहिसर मेट्रो ९ मार्गिकेवरील “मेडतीया नगर” स्थानकाच्या नावाला मराठी एकीकरण समितीचा विरोध, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची मागणी

मिरा भाईंदर – दहिसर मेट्रो ९ मार्गिकेवरील “मेडतीया नगर” स्थानकाच्या नावाला मराठी एकीकरण समिती चा विरोध

शहर अध्यक्ष सचिन घरत,शहर सचिव सिद्धेश पाटील यांनी समिती शिष्टमंडळासह आज दिनांक २५ जुलै रोजी याबद्दल मेट्रो प्रशासनाला निवेदन दिले.

🗓 दिनांक: २५ जुलै २०२५

📍 स्थळ: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मीरा भाईंदर

आज ‘मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र राज्य’ या आमच्या शिष्टमंडळाने MMRDA च्या मीरा रोड येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन मिरा भाईंदर मेट्रो क्र ९ मधील ‘मेडतीया नगर’स्थानकाच्या नावाला विरोध करून “स्वातंत्र्यवीर सावरकर” किंवा “सेनापती कान्होजी आंग्रे” असे नामकरण व्हावे याबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

या बैठकीदरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रकार्य, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि मराठी अस्मिता लक्षात घेता, व मराठा साम्राज्य आरमार प्रमुख शूर सेनापती यांच्या स्मरणार्थ स्थानकाच्या नामांतराची गरज स्पष्ट करण्यात आली.

आम्ही नमूद केले की, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महसूल नकाशांमध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चौक’ असा अधिकृत उल्लेख आधीपासूनच आहे, तसेच कान्होजी आंग्रे यांचे स्वराज्यासाठी योगदान आहे ती ओळख जपली पाहिजे. त्यामुळे मेट्रो स्थानकाला यापैकी नाव देणे हे स्थानिक ओळखीचे आणि सांस्कृतिक सातत्याचे प्रतीक ठरेल.

हा मेडतीया कोण त्याचा महाराष्ट्रात का संबंध हे नाव सुचवणारे मराठीद्रोही कोण?

मुंबई महानगर विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले व आवश्यक सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.

जय महाराष्ट्र, जय मराठी

चित्रफीत पहा : https://www.facebook.com/share/v/1Jn1tdPpPv/

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top