कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ भागातील डाॅ. अनिकेत पालांडे यांच्या श्री बाल चिकित्सालयात सोमवारी संध्याकाळी एका मराठी भाषिक स्वागतिकेला गोकुळ झा या परप्रांतीय तरूणाने बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटले होते. राजकीय नेत्यांनीही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यापाठोपाठ आता मराठी एकीकरण समितीनेही याप्रकरणी निषेध व्यक्त करत ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात काही दिवसांपर्वी एका परप्रांतीय गुंडाने निष्पाप मराठी तरुणीवर निर्घृण आणि अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना केवळ एका तरुणीवर हल्ला नसून, संपूर्ण मराठी समाजाच्या अस्मितेवरचा आघात आहे, असे मराठी एकीकरण समितीने म्हटले आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन गुरुवारी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित गुन्हेगारावर ठोस कारवाई करण्याची मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याचप्रमाणे मराठी एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पीडित मुलीला रुग्णालयात जाऊन भेट दिली. तिच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि तिच्या कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संवाद साधून या घटनेमुळे त्यांच्यावर झालेला मानसिक आघात समजून घेतला. समितीने त्यांना कायदेशीर, वैद्यकीय आणि सामाजिक आधार देण्याचे आश्वासन दिले असून संबंधित गुन्हेगारास कठोर शिक्षा होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला जाईल, याची खात्रीही दिली.

मराठी एकीकरण समितीची काय मागणी आहे?
या गुन्हेगाराची धिंड काढून समाजात इशारा देणारी ठोस कारवाई करावी. पीडित मराठी भगिनीच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी शासनाने घ्यावी. अशा परप्रांतीय गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींना शहरातून हद्दपार करावे, अशा मागण्या समिती पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्या निवेदनात केल्या आहेत.
काय प्रकरण होते?
कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ भागातील डाॅ. अनिकेत पालांडे यांच्या श्री बाल चिकित्सालयात सोमवारी संध्याकाळी अनन्या झा या त्यांचे लहान बाळ घेऊन आल्या होत्या. त्यांच्या सोबत पती, वहिनी आणि गोकुळ झा होते. डाॅक्टर रुग्णालयात आल्यानंतर पहिले औषध विक्रेता प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली. त्यांची डाॅक्टर दालनात चर्चा सुरू असताना झा कुटुंबीय आपणास लवकर प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्नशील होते. यावेळी मराठी स्वागतिकेने झा कुटुंबीयांना औषध विक्रेते प्रतिनिधी दालनातून बाहेर आले की मी तुम्हाला सोडते, असे बोलून तिने झा कुटुंबीयाला दालना बाहेर रोखले.
यावेळी झालेल्या बाचाबाचीमध्ये गोकुळने स्वागतिकेला शिवागाळ करत तो बाहेर गेला. दरम्यान संतप्त झालेल्या मराठी स्वागतिकेने आरोपी गोकुळ झाची वहिनी हिच्या कानशिलात मारली. यानंतर गोकुळ झा या परप्रांतीय तरूणाने स्वागतिकेला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटले होते. राजकीय नेत्यांनीही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. या तरुणाला अटक करण्याची मागणी होत होती. याप्रकरणात मानपाडा पोलिसांनी गोकुळ झा याच्यासह त्याच्या भावाला अटक केली आहे.
संबंधित चित्रफिती :
१) https://www.facebook.com/share/v/1D5SmZae2k/
२) https://www.facebook.com/share/v/19ZgSczse3/
३) https://www.facebook.com/share/v/1a5nQMrBWW/
४) https://www.facebook.com/share/v/1a5nQMrBWW/
५) https://www.facebook.com/share/v/1CryhhXtWW/
६) https://www.facebook.com/share/v/1DkdijUVKx/
संबंधित बातम्या :
१) परप्रांतीय गुंडाकडून मराठी तरुणीला मारहाण प्रकरण; मराठी एकीकरण समिती एकवटली : https://www.loksatta.com/thane/kalyan-marathi-receptionist-assaulted-by-outsider-in-hospital-marathi-ekikaran-samiti-demands-strict-action-vsd-99-5252583/?utm_term=Autofeed&utm_medium=Echobox&utm_source=Facebook&fbclid=IwY2xjawLxmxNleHRuA2FlbQIxMQABHg5O7slLsB9L1PZ6nzRN5xFIh3IDxhFgdb2wog7bQvImfazi8djsc6CBy5hW_aem_IeicpKUS1HekwPNIO44IAA#Echobox=1753359140
2) परप्रांतीय गुंडाकडून मराठी तरुणीवर अमानुष मारहाण – मराठी एकीकरण समितीचा तीव्र निषेध आणि ठोस कारवाईची मागणी! https://shaharnews.in/crime/परप्रांतीय-गुंडाकडून-मरा