
जय महाराष्ट्र! जय मराठी!!
आज महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेवर एक नव्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. केंद्र सरकारच्या वतीने हिंदी भाषा लादण्याचे धोरण राबवले जात असून, आता त्याच धोरणाला वैधता देणाऱ्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील नव्या समितीचे संकेत मिळत आहेत. ही समिती, संविधानविरोधी भूमिका, मराठी भाषेचा अपमान आणि महाराष्ट्राच्या अधिकारांवर आघात करणारी आहे.
या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी एकजुटीने आवाज उठवणे आवश्यक आहे. मराठी भाषा, शिक्षण आणि अस्मितेच्या रक्षणासाठी आपल्या हरकती शासनाकडे पोहोचवण्यासाठी आम्ही “ई-मेल मोहीम” सुरु करत आहोत.
🔥 डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आक्षेप कशासाठी?
✅ तटस्थतेचा अभाव – जाधव यांची हिंदी केंद्रित भूमिका आधीच जाहीर आहे.
✅ माशेलकर समिती संविधानविरोधी होती – तिच्या शिफारशी हिंदी लादण्याच्या दिशेने होत्या.
✅ राज्याच्या शिक्षण अधिकारावर आघात – केंद्र शासन राज्याच्या विषयात हस्तक्षेप करत आहे.
✅ मराठी शिक्षकांवर अन्याय – हिंदी सक्तीमुळे मराठी शिक्षक बाजूला पडण्याचा धोका आहे.
✅ विद्यार्थ्यांवर मानसिक ताण – ग्रामीण भागातील मुलांवर अभ्यासाचा अतिरिक्त बोजा.
🎯 आमच्या ठाम मागण्या
डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती त्वरित रद्द करावी.
स्वतंत्र, तटस्थ व मराठी समर्थक अभ्यास समिती स्थापन करावी.
केंद्राच्या हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्राची ठाम भूमिका जाहीर करावी.
सर्व भाषिक धोरणांमध्ये जनसंवाद व पारदर्शकता बंधनकारक करावी.
📩 आपल्या हरकती पाठवा — फक्त एक क्लिक!
आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक तयार ई-मेल मसुदा तयार केला आहे. खाली दिलेल्या बटणावर क्लिक केल्यावर Gmail उघडेल आणि सर्व माहिती भरलेली असेल. तुम्हाला फक्त “Send” बटण दाबायचं आहे.
धन्यवाद, जय मराठी जय महाराष्ट्र……