मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करावा ही मागणी

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या विभागाच्या मुख्य धोरणास अनुसरुन “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतात. तथापि, त्यामुळे या पंधरवड्याच्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष कृतीशील कार्यक्रम तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन जास्तीत जास्त कार्यक्रम साजरे करता येतील. ऑनलाईन पध्दतीने सदर कार्यक्रम साजरे करण्यात यावेत. सदर कार्यक्रम साजरे करताना वृत्तपत्र, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाणी इ. माध्यमांच्या प्रभावी अंमलबजावणीतून मराठीच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यक्रम आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त सुयोग्य कार्यक्रम आयोजित करुन पंधरवडा समारंभपूर्वक साजरा करण्यासाठी सर्व कार्यालयांना या अगोदर वरील अधिनियम सूचना देण्यात आलेल्या आहेत.

मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी खालीलप्रमाणे जास्तीत जास्त कार्यक्रम प्रत्यक्षरीत्या कृतीशील आणि ऑनलाईन पध्दतीने साजरे करण्यात यावेत.

तरी संबंधितांना आदेश देऊन मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात यावा व प्रत्यक्ष कृतिशील अंमलबजावणी करावी. आदेशाचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कडक कायदेशीर कारवाही करावी तसेच संबंधित आदेश आणि कार्रवाहीचा दस्तऐवज तक्रारदाराला उपलब्ध करून देण्यात यावा.

Scroll to Top