स्वयंरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या अवनी संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित नवीन मराठी व्यवसायानिकांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान

आज अवनी उत्सव या स्तुत्य सोहळ्याला मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष मा. श्री. गोवर्धन देशमुख साहेब तसेच समितीचे पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्ष साहेबांच्या हस्ते “अवनी” योजनेअंतर्गत पात्र नवीन व्यावसायिकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्षांनी भविष्यातील व्यावसायिकांना मोलाचे मार्गदर्शन केले व व्यवसाय करताना कोणत्याही अडचणी आल्यास मराठी एकीकरण समिती तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे आश्वासन दिले.

समारोपाला अध्यक्ष साहेबांनी आयोजकांचे आणि मान्यवरांचे आभार मानून या स्तुत्य उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 💐🙏

2 thoughts on “स्वयंरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या अवनी संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित नवीन मराठी व्यवसायानिकांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान”

  1. एकनाथ गवंडळकर

    त्रिभाषा सुत्राची ईथे जरूरी नाहि….मातृभाषा मराठीचा सन्मान राखला गेला पाहिजे….ईतर राज्ये हे कसोशीने पाळतात, आचरणात आणतात पण आपले महाराष्ट्रातील
    राजकारणी लोक ईथे कमी पडताना
    दिसतात हे सत्य आहे.

    एकनाथ गवंडळकर.

  2. निलेश चिकणे

    माझा त्रि भाषा सूत्रिला विरोध आहे. महाराष्ट्रात हिंदीची गरज नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top