सर्व सिनेमागृहात राज्यगीत वाजविण्याबाबत.

सर्व नागरीकांना स्फूर्तिदायक असणारे तसेच महाराष्ट्राच्या शौयाचे वर्णन करणारे अस्मितादर्शक असे राज्याचे अधिकृत राज्यगीत असावे, ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने, कवीवर्य श्री राजा नीळकंठ बढे लिखित “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे स्फूर्तीदायक गीत १९ फेब्रुवारी २०२३ रोजी “राज्यगीत” म्हणून स्विकारण्यात आले. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय,‌ शिवजयंती,‌ राष्ट्रीय दीन, १ मे‌ महाराष्ट्र, सर्व शिक्षण संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी आस्थापना, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविणे बंधनकारक आहे. त्या नियमाला अनुसरून राज्यातील सर्व सिनेमागृहात राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वाजविले जावे अशी आपणास पत्राद्वारे विनंती‌ करीत आहे.

Scroll to Top