महाराष्ट्र राज्य शासन
महाराष्ट्र राज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हे जिल्हे, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर अशा सहा महसुली विभागांमध्ये विभागण्यात आले आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात एकूण 33 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या आणि 27,906 ग्रामपंचायती कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्यात शहरी भागाच्या प्रशासनासाठी २८ महानगरपालिका, २१९ नगरपरिषदा, ७ नगर पंचायती आणि ७ कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यरत आहेत.