
मराठीचा अपमान — आता पुरे झालं!
महाराष्ट्राच्या भूमीवर, महाराष्ट्राच्या पोलिस खात्यात, मराठी माणसालाच “अरे तुरे” म्हणण्याचं धाडस एका अधिकाऱ्याने दाखवलं आहे!
मीरा-भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी नागरिकांना हिंदीत भाषण करताना, “मराठीमध्ये बोला” अशी साधी नम्र विनंती करणाऱ्या मराठी नागरिकाशी उद्धटपणे वागून मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान केला आहे!
हा अपमान फक्त एका व्यक्तीचा नाही —
हा अपमान आहे आपल्या मराठी अस्मितेचा, आपल्या मातृभाषेचा, आणि महाराष्ट्राच्या अभिमानाचा!
ज्यांना महाराष्ट्राची भाषा मान्य नाही,
ज्यांना मराठी ऐकायची सुद्धा लाज वाटते —
त्यांना या भूमीत अधिकारी राहण्याचा अधिकार नाही!
मराठी ही केवळ भाषा नाही,
ती आहे आपल्या अस्तित्वाचा श्वास, आपल्या संस्कृतीचा पाया, आपल्या रक्तातील अभिमान!
✊ आता वेळ आली आहे मराठीसाठी आवाज उठवण्याची!
सरकारने या अपमानाचा निषेध करावा,
संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी,
आणि महाराष्ट्रात मराठीचा सन्मान कायद्याने सुनिश्चित करावा —
हीच सर्व मराठी बांधवांची मागणी आहे!
🚩 खालील “ईमेल पाठवा” या बटणावर क्लिक करा —
तुमच्या मोबाईलमधील Gmail अॅप आपोआप उघडेल, आणि तयार ईमेल दिसेल.
फक्त Send करा —
आणि दाखवा की मराठी माणूस अजून जिवंत आहे, जागा आहे आणि स्वतःच्या भाषेसाठी लढणार आहे!

कारवाई करा
मराठी अस्मिता सर्वाधिक महत्वाची
Gondia la pathva ashya magrur police valyala, mantranchi chappal pan uchaltil he, lokanshi shistine vagta yet nahi hyanna
अशा अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे…
आपली संस्कृती आपला अभिमान 🇮🇳🤝
कारवाई अशी झाली पाहिजे की सगळ्या अधिकारी वर्गाला आयुष्भर लक्षात राहिला पाहिजे , मग तो कोणीका असेना ,आपल्यातला किंवा परप्रांतीय अधिकारी
मराठी मुलखात सूर्याजी पिसाळ ची औलाद अजून आहेत.
मराठी मुलखात सुर्याजी पिसाळ ची औलाद अजून आहेत.
अशा अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे…
Marathi bhashecha apman kadapi sahan karnar nahi
Jai maharahtra
Jai shivrai
आपल्या मायबोली मराठी भाषेस शासकीय अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही, स्वतः मराठा समाजाचा अधिकारी असून शासनाचा शासन निर्णय न पाळणे, एखाद्या सणाच्या नियमावली करिता सभा आयोजित केली असता मराठी भाषेकरिता आग्रहाची विनंती जाणीव पूर्वक करून दिली असता आपल्या पदाचा माज दाखवत भर सभेत मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य मा. प्रमोद सुधाकर पार्टे ह्यांचा अपमान करणाऱ्या कर्तव्यहिन, उद्धट तसेच अकार्यक्षम अधिकारी पोलीस उपायुक्त श्री राहुल चव्हाण यांचा जाहीर निषेध निषेध निषेध
आणि त्यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई होणे गरजेचे आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक व्हायला लागले मग जनतेकडून कायदा पाळण्याची अपेक्षा कशी करावी.
ॲड. जागृती शिर्के पार्टे
(M.com, L.L.B, L.L.M)
DCP वर गैरवर्तनाबद्दल कारवाई करावी.
ह्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे
कारण प्रश्न आपली भाषा व पुढच्या पिढ्याचा आहे.