मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) सभासदत्व
नियम आणि अटी :
-
संघटनेचे प्राथमिक सदस्यत्व केवळ मराठी भाषिकांना दिले जाईल. (जुने स्थायिक मराठी भाषा संस्कृती जोपासणारे, १९६० चा रहिवास असलेल्यांना सुद्धा)
-
संघटनेच्या कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप करू दिला जाणार नाही.
-
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांस राजकीय निवडणूक लढवायची असल्यास पदाचा राजीनामा द्यावा लागेल व राजकीय पक्षातील पदाधिकारी यांना संघटनेचे पदाधिकारी होता येणार नाही, मार्गदर्शक म्हणून नेमणूक होईल.
-
संघटनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही मुलाखत अथवा पत्रकारांशी संपर्क करू नये.
-
सदस्याने संघटनेच्या नावाने कोणतीही गैरकाम, गैरव्यवहार करू नये. तसेच आपल्या मराठी समाजात संघटनेची प्रतिमा डागाळेल असे कोणतेही कृत्य करू नये.
-
सदस्याने संघटनेच्या विविध उपक्रमांत/कार्यात वेळोवेळी सामील होऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करावा.
-
सदस्याने कोणत्याही मराठी राजकीय नेत्यावर, मराठी पक्षावर टीका टिपण्णी होऊ नये याची दक्षता घ्यावी. संघटनेला सर्वच राजकीय पक्ष समान आहेत.
आमचे सभासदत्व घ्या.
"मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)" यांचे सभासद होण्यासाठी कृपया खालील माहिती भरून आपले नोंदणी शुल्क/सभासदत्व रक्कम जमा करावी.
सभासद नोंदणी अर्ज भरून झाल्यावर खाली दिलेल्या बँक खात्यावर “सभासद वर्गणी” जमा करावी.
रु. २५०/वार्षिक फक्त
(रु. ५० नोंदणी शुल्क + रु. २०० वार्षिक वर्गणी)
- मराठी एकीकरण समिती
- बॅसेन कॅथलिक बँक
- मीरा रोड शाखा
- खाते – ०१४११०१००००४७१९
- आयएफएससी – बीएसीबी००००१४